आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कंपनीला आग

०६ डिसेंबर २०२२

आकुर्डी


आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कारखान्याला आग लागली आहे. एका शाळेला लागून असलेल्या या कारखान्यातील आगिने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आगीची ही घटना मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कंपनीत अचानक आग लागली. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळतात विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *