ठेच लागल्यावर अॅडमिट होणाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर बोलू नये – विनायक राऊत

२९ नोव्हेंबर २०२२


राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही टीकेचे बाण सोडले. यावर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

मनसेनी फक्त मुंबई मनपा जिंकण्याची स्वप्न पहावी, त्यांचं अस्तित्व नाही, निवडणुकीच्या तोंडावर सुपारी घेवून काम करायचे काम राज ठाकरे करतात. राज ठाकरे फक्त नक्कल करून राजकारण करतायत, बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता, उद्धव ठाकरेंच्या नावे आंतराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *