पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मेट्रो रेल्वेच्या बारा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण

०१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी-चिंचवड


मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गिकेमधील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहिल्स स्थानक या बारा किलोमीटर उन्नत अंतरातील शेवटचे दोन खांब एकमेकांना जोडण्याची (सेगमेंट) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेऊन फुगेवाडी ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार आहे.

फुगेवाडी ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या मार्गातील कामे तीन नोव्हेंबरपर्यंत, तर गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या टप्प्यातील कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *