एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर १८४ महिलांचा सन्मान; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद

पिंपरी-चिंचवड
२७ नोव्हेंबर २०२२


आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखी आयोजित राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सोहळा 2022 चे वितरण शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आचार्य आत्रे सभागृह पिंपरी-चिंचवड येथे दिमाखात संपन्न झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या 184 व्या जयंतीचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र दिल्ली गोवा कर्नाटक गुजरात या ठिकाणच्या महिलांची सामाजिक कार्याची व त्यांच्या क्षेत्रात असणा-या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहीती आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांनी दिली.

" इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड " मध्ये झाली राणी ' राणी लक्ष्मीबाई ' पुरस्काराची नोंद
” इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ” मध्ये झाली राणी ‘ राणी लक्ष्मीबाई ‘ पुरस्काराची नोंद

महिलांना फेटा बांधून त्यांचे औक्षण करून त्यांना हातात तलावर देऊन घोड्यावर बसवून त्यांचे फोटो काढण्यात आले.पुरस्कार स्विकारणा-या सर्वच महिला ह्या नऊवारी साडी व नथ घालुन उपस्थित होत्या.सदर पुरस्कार सोहळ्याचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे कोहिनूर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साह्यक पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड श्रीकांत डिसले नंदादीप प्रतिष्ठान च्या अध्यक्षा निता ढमाले अभिनेता अदिनाथ कोठारे अभिनेत्री अनिता दाते संदिप पाठक आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्यास सुरूवात करण्यात आली.

प्रास्ताविक आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी केले तर आभार आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांनी मानले सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर नऊवारी घालून पुरस्कार स्विकारणा-या 184 महिलांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आल्याची घोषणा डाॅ.चित्रा जैन यांनी केली.यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.सदर उपक्रमाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे कृष्णकुमार गोयल यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *