२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संत निरंकार च्या वतीने ओतूर परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२७ जानेवारी २०२२

ओझर


देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशन च्या वतीने व सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असील कृपाशीर्वादाने ओतूर येथील जि. प. प्राथमीक शाळा मुलींची येथील संपन्न झाला. यावेळी शाळेच्या परिसरामध्ये ३५ झाडांचे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसराची स्वच्छता या वेळी निरंकार मशीनच्या वतीने करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी जि.प.सदस्य मोहित ढमाले, ओतूरच्या सरपंच गीताताई पानसरे , उपसरपंच प्रेमानंद अस्वार , ग्रा.पं. सदस्य प्रशांत डुंबरे , तसेच आळेफाटा सेक्टर चे प्रमुख चंद्रकांत कुर्हाडे यांसह काशिनाथ गीते , गणेश तळपे ,दामोदर घुले ,दत्तात्रय तांबे व निरंकारी मिशनचे सेवादल सदस्य उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत ओतूर , ग्रीन व्हीजन ओतूर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. व सर्व उपस्थित मान्यवरांचे मनोज तांबे यांनी मनःपूर्वक आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *