महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

दि. ०४/०१/२०२३
मुंबई


मुंबई : खासगीकरणाच्या विरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये यशस्वी चर्चा पार पडली. तीन ते चार मुद्यांवर ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला महावितरणचे खासगीकरण करण्याचा विचार नाही, राज्य सरकार या तीनही कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिले. कंत्राटी कामगारांना नियमाने जो पगार मिळायला हवा तो मिळण्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. बैठक यापूर्वी झाली असती तर आंदोलन करण्याचीही वेळ आली नसती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *