महिन्याच्या दर आठवडयामध्ये दर गुरूवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम

मा. पोलीस आयुक्त, कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक शाखेचे प्रत्येक प्रभारी अधिकारी यांनी आपापले विभागामध्ये महिन्याच्या दर आठवडयामध्ये दर गुरूवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविणेत येत आहे. या उपक्रमाकरीता १ अधिकारी, २ अंमलदार यांचे नियोजन करुन प्रत्येक विभागातुन शाळेमध्ये मुलांना वाहतुकीचे नियम, व्यसनाधीनता, समाज माध्यम, सायबर गुन्हेगारी, याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता नेमणुक करण्यात येत आहे.

यापुर्वी दि. ७/१२/२०२३ रोजी वाहतूक शाखेमार्फत २० टिमच्या माध्यमातुन, निवडलेल्या २० शाळांमधुन सुमारे ७७०१ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये दि. १४/१२/२०२३ रोजी पुन्हा दुस-या आठवडयात वाहतूक शाखेमार्फत २० टिमचे माध्यमातुन एकुण २० शाळांमधुन सुमारे ४६७५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसुद् मार्गदर्शन केले. अशाप्रकारे २ आठवडयामध्ये एकुण १२३७६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना एक चांगला नागरिक व चांगला माणुस बनविण्याचा उपक्रम समाज सुधारण्याचे दृष्टीने वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड यांनी हाती घेतला आहे.

वरील उपक्रम  विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,   संजय शिंदे पोलीस सह आयुक्त,  वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली  बापू बांगर पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा  भास्कर डेरे सहायक पोलीस आयुक्त-१ वाहतूक शाखा,  सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त -२ वाहतूक शाखा व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांचे मार्फतीने दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी यशस्वीरित्या राबविण्यात आला.

1647212023. ( बापू बांगर )

पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *