बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक
पिंपरी : दि ६ नोव्हेंम्बर, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विशेष सभेत तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या निवडीत कामगार नेते केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी कुनाल खेमणार यांच्याकडे अर्जे देऊन निकिता कदम यांनी माघार घेतली. चुरशीची निवडणूक होईल असे वाटत असताना राष्ट्रवादी ने माघार घेतल्याने घोळवे यांचा मार्ग सुकर झाला. पक्षनेते नावदेव ढाके, उमेदवार केशव घोळवे, यांनी राष्ट्रवादी च्या नेत्यांना विनंती केली त्यानंतर निकिता कदम यांनी माघार घेतली.
यावेळी पालिकेत मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग आला पालिकेत हजर होते.
या निवडीमागे घोळवे याना मुंडे गटाचा पाठिंबा मिळाला असे असले तरी यामागे पडद्यामागून गिरीश बापट यांनी सूत्रे हलवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
उपमहापौर घोळवे यांच्या निवडीनंतर महापौर उषा उर्फ माई ढोरे , माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर मंगला कदम, पक्षनेते नामदेव ढाके,आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी स्वागत केले.