जगाची लोकसंख्या 800 कोटींवर, भारताची 135 कोटींहून अधिक

१५ नोव्हेंबर २०२२


जगातील लोकसंख्येनं 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये भारताचा वाटा 135 कोटींहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्र संघाने याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवारी जगानं 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. 48 वर्षानंतर जगाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या 400 कोटी इतकी होती. 21 व्या शतकाच्या शेवटापर्यंत जगाची लोकसंख्या 1000 कोटी इतकी होईल, त्यानंतर जगाची लोकसंख्या वेगानं वाढणार नाही, उलट कमी होऊ शकते. कारण जगाचा जन्मदर कमी व्हायला लागलेला आहे. त्यानुसार लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी होऊ शकते, असं संयुक्त राष्ट्रांने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी जगाच्या लोकसंख्येनं 800 कोटींचा (8 Billion) टप्पा पार केला आहे. 2030 पर्यंत ही संख्या 850 कोटी, 2050 पर्यंत 970 कोटी आणि 2100 पर्यंत1040 कोटींपर्यंत (10 Billion) पोहचण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत आपलं सरासरी आर्युमान 77.2 वर्ष इतकं होईल, असा अंदाज आहे. 2019 मध्ये आपलं सरासरी आर्युमान 72.2 वर्ष इतकं होतं. तर 1990 मध्ये आपलं अंदाजे आर्युमान 63 वर्ष इतकं होतं. त्याशिवाय पुरुषांच्या तुलनेत महिला 5.4 वर्ष जास्त जगतात, महिलांचं सरासरी वय 73.4 वर्ष इतकं आहे तर पुरुषांचं सरासरी वय 68.4 वर्ष इतकं आहे, असेही रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *