कोण होणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थायी सभापती उद्याच निश्चित होणार ?

पिंपरी दि १ मार्च २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला असून नवीन सभापतींची निवड येत्या ५ मार्च रोजी करण्यात येणार आहे. नवीन सभापती कोण होणार आणि या शहराच्या चाव्या कोणाकडे जाणार हे उद्या मंगळवार दि २ मार्च रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी ३ ते ५ या कालावधीत नगरसचिव व अतिरिक्त आयुक्त ३ उल्हास जगताप यांचेकडे उमेदवारी अर्ज जमा करावयाचे आहे.

स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाचे च वर्चस्व असल्याने त्यांनी दिलेला उमेदवार सभापती होणार हे जवळजवळ निश्चित आहे.
भारतीय जनता पक्षाकडून रवी लांडगे, अँड नितीन लांडगे, सुवर्णा बुरुडे, हे भोसरी विधानसभा मतदार संघातील तर शत्रुघ्न काटे , अभिषेक बारणे ,सुरेश भोईर हे चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगर सदस्य इच्छुक आहेत.


५ मार्च रोजी होणारी निवडणूक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरव राव यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना तसे आदेश दिले आहेत.