मांडवाला लागलेल्या आगीत 2 गाईंचा होरपळून मृत्यू, तर इतर गाई – वासरे होरपळल्याने गंभीर जखमी

प्रतिनिधी – अक्षता कान्हूरकर, दावडी ( राजगुरुनगर )

दि. २४ एप्रिल रोजी गारगोटवाडी गावातील कारामळी येथिल रहिवासी अरूण काळोखे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. यासाठी त्यांनी संकरित ८-९ गाईंचे / वासरांचे पालन केले आहे. यासाठी बाजरीच्या सरमाडापासून बांधण्यात आलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याच प्रयत्न केला मात्र या अग्निकांडात जनावरांचे मालक गोठ्यापर्यंत पोहचेपर्यंत २ गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर काही गाई जनावरे आगीतुन दावी सोडुन बाहेर काढण्यात आली. परंतु सर्व गाई वासरे आगीत होरपळल्याने उपचाराला मोठा खर्च होणार असला तरी त्यातून गंभीर स्वरूपात भाजलेल्या या गाईंमधील किती गायी वाचू शकतील हे मात्र अस्पष्ठच आहे. अशी ही दुर्दैवी वेळ या मुक्या प्राण्यांवर ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त मो जात आहे.


अशी वेळ कुणा शेतकरी परिवारावर येऊ नये. अत्यंत दुःखद घटना या कुटुंबावर आली आहे. आपण सर्वांनी या कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून समाजातील सर्व क्षेत्रातील लोकप्रतिनिधीनी, शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे हि नम्र विनंती.