रयत फाउंडेशनकडून बालदिनाचे औचित्य साधून ५ मुलांच्या शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी उचलली

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


रयत फाउंडेशन तर्फे बालदिनाचे औचित्य साधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी रयत फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले व असे प्रतिपादन केले की ही सर्व मुले उद्याचं भारताचं भविष्य आहेत यांनी व आपण सर्वांनी भारताला सार्वभौम राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबरने रयत फाउंडेशनचे खजिनदार विपुलजी सागवान यांनी असे प्रतिपादन केले की भविष्यात आर्थिक अडचणीमुळे कोणाचे शिक्षण थांबू नये म्हणून सध्या ५ मुलांच्या त्यांचे संपुर्ण शिक्षण पुर्ण होईपर्यंत सर्व शैक्षणिक साहित्य व फी स्वरूपात मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे. तसेच उपाध्यक्ष बालाजी काकडे रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव सर, ढोरे सर ,रयत फाउंडेशनचे अजय चव्हाण, प्रकाश घोडके, मारुती काकडे, नीरज सुतार, ओमकार भोईर, अभिजित कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *