पासपोर्ट काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास दीड महिना वाट पाहावी लागते

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


गेल्या पाच वर्षांपासून पासपोर्ट काढण्याची सुविधा पिंपरीतील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिल आहे . मात्र , पासपोर्ट काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये केवळ दोनच काऊंटर असल्याने नवीन पासपोर्ट काढणाऱ्याला नंबर येण्यासाठी तब्बल ४० ते ५० दिवस म्हणजे जवळपास दीड महिना वाट पाहावी लागते . पिंपरीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट केंद्र आहे. पोस्टाने पूर्णवेळ दोन कर्मचारी दिले . अर्जांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत त्यावर कार्यवाही करणारे अवघे दोन कर्मचारी त्यामुळे अर्जदारांना दीड महिना थांबावे लागत आहे .

पुण्यात देखील २० ते २५ दिवसांचे वेटिंग पिंपरीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्टसाठी दीड महिना वाट पाहावी लागणार असल्याने नागरिकांकडे पुण्यातील कोंढवा येथून पासपोर्ट काढण्याचा पर्याय खुला आहे . मात्र , तेथे देखील तब्बल २० ते २५ दिवसांचे वेटिंग आहे . त्यामुळे पिंपरी – चिंचवडमधील नागरिक पासपोर्टसाठी कोंढव्याला जाण्याचे टाळून पिंपरी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यास प्राधान्य देतात . पोस्टाचे दोन पूर्ण वेळ कर्मचारी पासपोर्टच्या कामासाठी असतात . दिवसभरात साधारण ८० अर्जावर काम केले जाते . जर पासपोर्ट कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आणि वरिष्ठ कार्यालयाकडून कर्मचारी वाढविण्याची सूचना केली तर आणखी मनुष्यबळ या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *