‘शिवभोजन थाळी’ची चव गेली

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


मोठा गाजावाजा करत शिवभोजन थाळी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘ शिवभोजन थाळी’ची चव गेली आहे . भेंडीची पातळ भाजी , कडक चपाती , थोडासा भात , दोन चमचे वरण असलेली थाळी केंद्र चालकांकडून दिली जाते . मागितल्यावर डाळ मिळते , पण त्यामध्ये डाळ कमी आणि पाणीच जास्त आढळून आली . गरीब व कष्टकऱ्यांना एकवेळचे जेवण अत्यल्प दरात मिळावे , यासाठी दोन वर्षापूर्वी महाआघाडी सरकारने केवळ दहा रुपयांत ‘ शिवभोजन थाळी ‘ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली . त्यावेळी कोरोना व लॉकडाउनचा काळ होता . हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार गेले , निराधार लोकांची उपासमार सुरू झाली . यातूनच राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत आर्थिकदृष्ट्यामागास लोकांसाठी २०२० मध्ये ही योजना सुरू करण्यात आली . यानंतर ती सुरूच झाली . या योजनेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी मजूर आपले पोट भरत आहेत . मात्र , शासनाने कंत्राट दिल्यावर ठरवून दिलेला मेन्यू आणि उत्कृष्ट दर्जा भूकेल्याला देणे आवश्यक आहे . परंतु , नाविन्य ओसरल्यावर केंद्र चालकांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अपुरे जेवण दिले जावू लागले आहे .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *