छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे – जयंत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.आव्हाडांवरील कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. असं जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना मुद्दाम अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या मागे खंबीर उभा आहे. महाराष्ट्रातील जनता शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड कदापि सहन करणार नाही. इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना सरकार पाठिशी घालत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.हर हर महादेव चित्रपटात या विपरीत गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. इतिहासात नोंद नाही अशा गोष्टी दाखवल्या जात आहेत. हे काही योग्य वाटत नाही. इतिहासाची मोडतोड झाली तर लोक सहन करणार नाहीत. सरकारने इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांचे समर्थन करू नये, उलट त्यांना जाब विचारावा.असंही जयंत पाटील म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *