शिंदे गटाच्या १२ खासदारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत आणि शिंदे गटात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर १२ खासदारांनी संजय राऊतांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. याबाबत संजय राऊतांनी २ खासदारांवर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, अच्छा, मी इतका मोठा आहे का? म्हणून त्यांनी मला तुरुंगात डांबलं होतं का? आत्ता मला रहस्य कळलं की, त्यांना मला उत्तर देता येत नव्हतं म्हणून त्यांनी मला १०० दिवस तुरुंगात डांबलं. हे १२ खासदारांनी सांगितलं ते बरं केलं. शिंदे गटाकडून नोटीसही पाठवली जाऊ शकते या शक्यतेवर संजय राऊत म्हणाले, अजून मी काहीच बोललेलो नाही. म्हणजे माझ्या मौन व्रतात इतकी ताकद आहे. किंबहुना, गेली दोन दिवस मी कटुता विसरावी असं बोलतोय. तेही त्यांना पटत नाही का? या महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता राहू नये, हे देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आशादायी आहे असं मी म्हणालो तेही त्यांना आवडत नाही. अशा भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र कळालेला नाही. त्यांना बाळासाहेब ठाकरे कळाले नाही. त्यांना यशवंतराव चव्हाण किंवा महाराष्ट्राची परंपराही कळली नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *