शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मंगळवारपासून

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे मंगळवारपासून ता . १५ , १७ डिसेंबरपर्यंत आयोजन केले आहे . विविध मैदाने , जलतरण तलाव , क्रीडा संकुलांसह विविध शाळांच्या परिसरात १४ , १७ , १ ९ अशा वयोगटातील मुले , मुलींच्या स्पर्धा होणार आहेत , अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली . क्रिकेट , टेबल टेनिस , बुद्धीबळ , शालेय फुटबॉल , कराटे , तलवारबाजी , किक बॉक्सिंग , रायफल बास्केटबॉल , स्क्वॅश , योगासन , शुटींग , बॉक्सिंग , थ्रोबॉल , खो खो , हॉलीबॉल , लॉनटेनिस , बॅडमिंटन , रोलर स्केटिंग , जलतरण व डायव्हिंग , वॉटरपोलो , जिम्नॅस्टिक्स , शुटींग बॉल , मल्लखांब , रोप मल्लखांब , टेनीक्वाईट , रोलर हॉकी , हँडबॉल , कॅरम , वेट लिफ्टिंग , नेटबॉल , सिकई मार्शल आर्ट , शालेय रग्बी , हॉकी , सायकलिंग , सॉफ्टबॉल , बॉल बॅडमिंटन , सेपक टकरा , तायक्वांदो , बेसबॉल , कुस्ती- फ्रीस्टाईल , ग्रिकोरोमन , ज्युडो , कबड्डी , सॉफ्ट टेनिस , रोल बॉल , धनुर्विद्या , वुशू आदी ४ ९ खेळ प्रकारांचा समावेश आहे . खेळाडूंच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छता , पिण्याचे पाणी , वैद्यकीय पथक , अॅब्युलन्स , सुरक्षा पथक यांच्यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत , अशी माहिती प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *