सात दिवसात स्वाधारची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, तर अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासणार – वंचित बहुजन युवा आघाडी

शैलेश जाधव
बातमी प्रतिनिधी 
०९ जून २०२२

पुणे


सामाजिक न्याय विभाग पुणे येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी राज्य उपायुक्त डोके सर व गायकवाड सर यांची भेट घेऊन स्वाधार रक्कमेच्या तरतुदी संदर्भात चर्चा केली. सर्व रक्कम जिल्हानिहाय वितरीत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे.


मागील 2020-21 या वर्षाची रक्कम व शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या दोन्ही वर्षाची रक्कम तरतूद होऊनसुद्धा अद्यापही विद्ध्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तरी या योजनेची दोन्ही वर्षाची रक्कम येत्या सात दिवसात वितरीत न झाल्यास युवा आघाडी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांच्यावतीने देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे, वंचितचे संतोष जोगदंड, अनंत सरवदे, अक्षय तायडे यांची उपस्थिती होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *