महापालिका शाळांमध्ये होणार आरोग्य तपासणी

१० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी , बौद्धिक पातळीचा अभ्यास करून गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत . त्यासाठी अनेक वर्षांपासून एकाच शाळेत ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली . प्राथमिक ,माध्यमिक शाळा आहे. या शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी लक्ष घातले आहे . त्यानुसार , पहिल्या टप्प्यात १० शाळा मॉडर्न करण्याचा पालिकेचा मानस आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत शाळांबाबत सूचना केल्या . या संदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले ” महापालिकेच्या पाच शाळांना भेटी दिल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे . एकाच ठिकाणी आठ ते दहा वर्ष काही शिक्षक नोकरी करीत आहेत ; मात्र एकाच ठिकाणी जास्त काळ काम केल्याने त्यांची त्या मक्तेदारीची परिस्थिती निर्माण होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *