सांगवीत सात लाखांची घरफोडी

०९ नोव्हेंबर २०२२

सांगवी


दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील २० तोळे सोने आणि दीड किलो चांदी असा सात लाख ८ ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला . ही घटना शारदा कॉलनी , पिंपळे निलख येथे सोमवारी दि . ७ सकाळी उघडकीस आली . रोहित जगदीश पंचवाघ ३३ , रा . पिंपळे निलख यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शनिवारी सकाळी देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर येथे गेले होते . दरम्यान , त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता . चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला . बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटून २० तोळे सोने , दीड किलो चांदीचे दागिने असा एकूण सात लाख ८ ९ हजारांचा ऐवज नेला . फिर्यादी सोमवारी मध्यरात्री घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *