अब्दुल सत्तारांनंतर रामदास कदमांचीही जीभ घसरली

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. सत्तारांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सत्तार यांच्यानंतर रामदास कदम यांची अर्वाच्य भाषा

करत रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही, अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनादेखील आपल्या भोवती असेच…… लागतात अशा अर्वाच्य भाषेत कदम यांनी टीका केली. कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. देसाई हे उद्धव यांचे कान चावतात, त्यांचे कान भरत असल्याचे कदम यांनी म्हटले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *