उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोरोना पॉझिटिव्ह

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

मुंबई: दि २६ ऑक्टोबर
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.

  • अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *