‘नृत्यांजली ‘ संस्थेतर्फे ‘नुपूरनाद ‘ कार्यक्रमात कथक नृत्याचे शानदार सादरीकरण !

दि. १७/०१/२०२३

पिंपरी

 

चिंचवड : ‘नृत्यांजली ‘  संस्थेतर्फे आयोजित  ‘नुपूर नाद’ या कथक नृत्य  कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.  प्रसिद्ध नृत्य गुरु पं. नंदकिशोर कपोते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नृत्यांजली संस्थेच्या संस्थापक गीता कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यानी बहारदार  कथक नृत्यप्रकार सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर(पिंपरी) येथे करण्यात आले होते.

गीता कुलकर्णी यांनी गतभावात प्रस्तुत केलेल्या द्रौपदी वस्त्रहरण याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.नृत्य गुरु कल्याणी कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर अशी गणेश वंदना प्रस्तुत केली. नुपूर नाद या कथक सादरीकरणाचे सूत्रसंचालन गौरी मोरे यांनी केले.  या कार्यक्रमात कथक मधील परंपरेनुसार ताल प्रस्तुती, गतभाव तराना, सरगम गीत, लमछड कविता असे विविध प्रकार सादर केले गेले. गायत्री कुलकर्णी यांनी ‘काहे रोखत डगर ‘ या ठुमरीवर अतिशय सुंदर असे नृत्य प्रस्तुत केले .गीता कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी यांच्याबरोबर एकूण ४० विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला .आभार प्रदर्शन गीता कुलकर्णी यांनी केले.
उमेश पुरोहित, प्राजक्ता ठकार, गिरीजा कुलकर्णी, अमोल राऊत, ज्ञानेश कोकाटे, मोहित पुरणकर यांनी साथसंगत केली. पूजा कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड व माय वॉव ज्वेल्स एलएलपी (वाकड) यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *