ऐतिहासिक सिनेमांबाबत संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


ऐतिहासिक सिनेमांबाबत शिवाजी महाराजांचे वारसदार संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागानं घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजीराजेेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय.

महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा,खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे ह्यानी सुरु केली अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप कारण त्यांचे लिखित पुस्तक होतेच तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *