![](https://i0.wp.com/aaplaawajnews.com/wp-content/uploads/2021/05/IMG-20210529-WA0019.jpg?resize=1024%2C579&ssl=1)
ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
दि.२९ मे २०२१ ( ओझर ): नुकतेच नारायणगाव -ओझर -परिटवाडी अष्टविनायक रस्त्याचे बरेच दिवस रखडलेले काम चालू झाल्यानंतर परिटवाडी येथील स्थानिक नागरिक व धालेवाडी गावचे सरपंच व उपसरपंच यांनी हे कामकाज बंद पाडले. जवळजवळ एक कि.मी.च्या ह्या रस्त्याला फाँरेस्ट विभागाची परवानगी मिळत नसल्या कारणाने बरेच दिवस हा रस्ता ठेकेदारांनी फक्त उकरून ठेवला होता. त्यामुळे ह्या रस्त्यावर फक्त आणि फक्त धुळीचे साम्राज्य होते. तसेच परिटवाडी गावालगत असणाऱ्या टेकडीवरून येणारे पावसाचे पाणी पूर्ण परिटवाडी गावात व शेतात शिरत असल्या कारणाने येथील स्थानिक नागरिक व शेतकर्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.. त्यामुळे नाईलाजास्तव परिटवाडी येथील नागरिकांनी हे अष्टविनायक रोडचे कामकाज बंद पाडले व जोपर्यंत आपण ड्रेनेज लाईन करून देत नाही व धूळीची समस्या सोडवित नाही तोपर्यंत हे काम चालू करू देणार नाही अशी आग्रही भूमिका धरली.तदनंतर सरपंच संजय दुधवडे व उपरसपंच सुभाष दळवी व ग्रामस्त यांनी आमदार साहबांकडे धाव घेतली व रोडसंदर्भातील सर्व अडणींचा पाढा आमदार साहेबांपुढे कथन केला.यानंतर आमदार अतूल बेनके यांनी अष्टविनायक रोडचे संबधित ठेकेदार यांना योग्य त्या सुचना देऊन परिटवाडी येथील ग्रामस्थांच्या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या .त्यामुळे परिटवाडी येथील नागरीकांनी आमदार अतूल बेनके यांचे आभार मानले. तसेच आपला आवाज चँनेलने वेळोवेळी ह्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यामुळे धालेवाडी गावचे सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थ यांनी चँनेलचे आभार मानले.