भाजपच्या मोठ्या हालचाली ; पुणे-पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष बदलणार ?

दिनांक- मंगळवार २१/०३/२०२३
प्रतिनिधी- प्रसन्न तरडे


पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अंतर्गत गोठातून समजत होती परंतु आता याच्यावर लवकरच शिक्कामोर्तब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे,पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आणि जिल्ह्याचा अध्यक्षही बदलणार असल्याची माहिती सध्या सूत्रांमार्फत मिळत आहे. भाजपच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदासाठी आशा बुचके, राहुल कुल, शरद बुट्टे, धर्मेंद्र खांडरे यांचे नवे चर्चेत आहेत तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
तसेच पुणे शहराध्यक्ष पदासाठी मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, धीरज घाटे आणि किरण दगडे यांच्या नावं चांगलीच चर्चेत आहे.
पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने खांदेपालट होणार आहे तर कसब्याच्या पराभवानंतर पुणे शहराध्यक्षांची देखील खांदेपालट करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आलेली होती. आता पाहणं महत्वाच ठरणार आहे कि कोणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षची माळ पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *