आदित्य ठाकरेंच्या आणखी एका सभेला परवानगी नाकारली

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात गांधी भवन परिसरात आयोजित केलेल्या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय याच परिसरात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असे कारण पोलीस प्रशासनाकडून समोर आणले गेले आहे व नियोजित सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

बुलढाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते. त्यानुसार ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली. परंतु राजकीय दबावाखाली सभा नाकारण्याचे काम केले जात आहे. असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *