पिंपरी चिंचवड शहरात आज रात्री पुरेल एव्हडाच साठा शिल्लक. ऑक्सिजनविना काही झाले तर फार विदारक चित्र शहरात असेल – आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि २० एप्रिल २०२१
कोरोणाची दुसरी लाट अतिशय भयानक आहे. पुणे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असणारे शहर आहे. त्यात पिंपरी चिंचवड मध्ये दिवसाला दोन हजाराच्या वर रुग्ण सापडत आहेत. दिवसेंदिवस परस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. रोज पिंपरी चिंचवड शहरात 50 च्या वर रुग्ण दगावत आहेत. आणि शहरात रेमडिसिवीर असो की ऑक्सीजन बाबत पुणे विभागीय प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजप चे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
आज ची ऑक्सीजन बाबतची परस्थिती फारच भयाण असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले आज रातभर पुरेल एव्हढाच ऑक्सिजन चा साठा शहरात आहे. काहीही होऊ शकते शेकडो रुग्णांचा प्राण ही जाऊ शकतो. पुणे प्रशासन फोन केला तर गांभीर्याने घेत नाही असेही सांगितले. पिंपरी चिंचवड शहराला दुय्यम वागणूक दिली जात आहे.
शहरात फार विदारण परस्थिती आहे मी शब्दात सांगू शकत नाही. अनेक पेशंट मृत्यूच्या दारात आहेत. रुग्णांना वाचवण्यासाठी आमचे प्रशासन, डॉकटर लोकप्रतिनिधी , कार्यकते खूप प्रयत्न करत आहेत. अगोदरच आपण रेमडीसीविर चे पाहत आहोत त्यात आता ऑक्सिजन ची परस्थिती बिकट असून त्याविना काही झाले तर फार विदारक चित्र असेल. माझ्यासारखा लोकप्रतिनिधी किती प्रयत्न करू शकतो अशी हताश प्रतिक्रीया दिली. आणि आपण आमच्या शहराला त्वरित ऑक्सिजन चा साठा पाठवावा असे शासनाला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *