आरोग्य केंद्रांवर महिलांची मोफत आरोग्य तपासणी

पिंपरी प्रतिनिधी
३० सप्टेंबर २०२२


महिलांचे आरोग्य सुदृढ असेल तर सर्व कुटुंबाचे पर्यायाने समाजाचे आरोग्य सुदृढ राहील . स्त्रियांचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सूचनांनुसार नवरात्र उत्सवाचे औचित्यसाधून ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे . या अभियानाअंतर्गत १८ वर्ष वयोगटावरील सर्व महिला , माता , गरोदर महिला यांची सर्वांगीणतपासणी करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने तसेच अंगणवाड्यांमध्ये ही तपासणी केली जाणार आहे . त्याचप्रमाणे झोपडपट्टीमध्ये महिला व मातांच्या तपासणीसाठी शिबिर भरवण्यात येत आहे . कशाची होणार तपासणी? सर्व रुग्णालयांमध्ये अॅनिमिया मुक्त कॉर्नरमध्ये रुग्णांचे समुपदेशन करण्यात येणार आहे . सोनोग्राफी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे . रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी , एक्स – रे , समुपदेशन सेवा दिल्या जाणार आहेत. खासगी डॉक्टरांचाही सहभाग या मोहिमेमध्ये शहरातील खासगी डॉक्टर सहभागी होणार आहे. त्यामध्ये शहरातील डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी शिबिराच्या ठिकाणी जाऊन महिलांची तपासणी करणार आहेत. महापालिकेच्या दवाखाना रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रामधील विविध झोपडपट्टी, अतिजोखमिचा भाग अशा ठिकाणी मातांच्या तपासणीसाठी बाह्यसंपर्क तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *