बिल न भरल्यास वीजपुरवठा होणार नाही; महावितरण बनावट संदेश

०४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


वीजपुरवठा रात्री ९.३० नंतर टॉवर ऑफिसकडून कट करण्यात येणार आहे. बिल न भरल्यास या महिन्यापासून वीजपुरवठा होणार नाही. त्यासाठी, कस्टमर केअर पॉवर हाउसच्या ९८७५६७८१२१ या क्रमांकावर संपर्क साधा.’ असा बनावट संदेश पाठवून त्यात बॅंक खात्याची माहिती व ओटीपीद्वारे सर्व माहिती भरण्यास सांगितले जात आहे. परिणामी, दिवसाढवळ्या नागरिकांच्या बॅंक खात्यावर सायबर चोरटे हल्ला करत असल्याचे दिसत आहे. महिन्याकाठी अशा प्रकारे २८ ते ३० तक्रारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर विभागात दाखल होत आहेत.

चिंचवड, पिंपळे सौदागर, चिंचवडगाव अशा विविध भागातील नागरिकांना बनावट संदेश प्राप्त झाले आहेत. वीजबिल भरुनही काहींना संदेश आले आहेत. तर, काहींच्या नावावर वीज मीटर नसून देखील त्यांना देखील संदेश आलेले आहेत. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. वीजबिल थकले आहे किंवा कोणत्या महिन्याचे वीजबिल भरले नाही याची माहिती न घेता लिंकवर क्लिक करताना नागरिक आततायीपणा करताना दिसत आहेत. शिवाय, वीजबिलाची हार्डकॉपी इ मेल किंवा घरी येत असूनही नागरिक अशा प्रकाराला बळी पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे, अशा प्रकारामुळे लाखो रुपयांचा हजारो रुपयांचा गंडा दिवसाढवळ्या घातला जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *