नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासदार नवनीत राणा यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना ‘आळशी माणूस ऑफ द इयर’ म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंना ओळखत नसल्याचं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीने त्या अभिनय करत आहेत, ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलत आहेत.. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मग देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटलं. मला नवल वाटतंय. त्यांना जर आळशी माणूस शोधायचाय, तर ‘मातोश्री’मध्ये जाऊन शोधावा. तो आळशी माणूस त्यांना तिथे भेटेल असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. आळशी माणूस ऑफ द इयर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांना शोधता येईल. उद्धव ठाकरे जेवढे संपूर्ण ५६ वर्षांत फिरले नसतील, तेवढे या तीन महिन्यांत फिरले असतील. त्यामुळे आळशी माणूस जर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शोधून घेतला पाहिजे”, असंही राणा म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *