शिंदे गटात मी नाराज नाही, सुषमा अंधारेंच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांच स्पष्टीकरण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. त्यापैकी एक म्हणजे संजय शिरसाट हे नाराज आहेत. ते लवकरचं ठाकरे गटात येतील, असा दावा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. यासंदर्भात संजय शिरसाट म्हणाले, आमची ताई सुषमा अंधारे मला भावाप्रमाणे समजते. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. कुणीतरी माझी काळजी करणारा आहे. पण, अशी कोणतीही नाराजी माझ्याकडं नाही. मी नाराज नाही.

मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज असल्याची खोटी माहिती दिली जात आहे. मंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. शिंदे गटात मी नाराज नाही. सुषमा अंधारे यांनी दावा केला त्यात कोणतही तत्थ्य नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *