पोखरी,तालुका आंबेगाव येथे आदिवासी साहित्यिक डॉ. गोविंद गारे स्मृति दिवस साजरा.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२९ एप्रिल २०२२

पोखरी


पोखरी तालुका आंबेगाव, येथे आदिवासी साहित्यिक डॉ. गोविंद गारे पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आंबेगाव तालुका, शाखे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आंबेगाव तालुका अध्यक्ष गणेश वडेकर हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते सिताराम जोशी हे होते. यावेळी डॉ. गोविंद गारे, आदिवासी साहित्यिक, माजी सनदी अधिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन व आद्य क्रांतीकारक- बिरसा मुंडा, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

‘आदिवासी साहित्य व सामाजिक योगदान’ या विषयावर प्रा. सीताराम जोशी यांनी डॉक्टर गोविंद गारे यांचे आदिवासी समाजासाठी योगदान व TRTI च्या स्थापनेमध्ये त्यांचे योगदान, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ .शशिकांत साळवे यांनी आदिवासी तरुणांनी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवावे, या विषयी मार्गदर्शन केले. तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशन तालुका शाखेचे सचिव, शंकर गाडेकर यांनी डॉक्टर गोविंद गारे यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी अनुयायी ,फोलोअर बनून भविष्यात त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य पुढे न्यावे याविषयी माहिती दिली. याप्रसंगी फेडरेशन तालुका शाखेचे उपाध्यक्ष – दिपक कोरके उपाध्यक्ष राजेंद्र बेंढारी सहकार्याध्यक्ष -सुनील दांगट ,संघटक- लक्ष्मण भारमळ, प्रसिद्धीप्रमुख- सखाराम केंगले, सदस्य मंगेश जोशी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आंबेगांवचे सर्व पदाधिकारी, यांनी केले .प्राचार्य डॉॅ. शशिकांत साळवे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *