माझ्या मतदारसंघातही नंबर दोनचे पप्पू येणार आहेत; अब्दुल सत्तार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आदित्य ठाकरेंवर पप्पू म्हणून टीका केली आहे. त्यावरून ठाकरे गटाकडूनही अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरा काढत असून येत्या ७ तारखेला ते अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाणार आहेत. खुद्द अब्दुल सत्तार यांनीच तशी माहिती दिली असून तेव्हा कुणाच्या सभेला किती गर्दी होणार, हे कळेलच, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

ठाकरे गटाकडून ४० बंडखोर आमदारांविरोधात मिशन ४० सुरू करण्यात आलं आहे यावर अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. कुणी कोणतंही मिशन चालू केलं, तरी मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी जे मिशन देतील, तेच अंतिम असेल. माझ्या मतदारसंघातही नंबर दोनचे पप्पू येणार आहेत. ते जेव्हा माझ्या मतदारसंघात येतील तेव्हा कोणाच्या सभेत किती गर्दी येईल ते दिसेल असं अब्दुल सत्तार म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *