अखेर रेल्वे पोलीस गणेश दहीफळेचा मृतदेह सापडला..

एनडीआरएफचा शोध अयशस्वी..मृतदेह सापडला ठाकरवाडीतील हद्दीमधे मांडओहळ नदीपात्रात…

दत्ता गाडगे विभागीय संपादक : – गेल्या तीन दिवसांपासुन मांडओहळ धरणाजवळील रुईचोंडा धबधब्यामधे गायब झालेल्या रेल्वे पोलीस गणेश दहिफळे याचा मृतदेह वासुंदेच्या ठाकरवाडी हद्दीमधे मांडओहळ नदीपात्रात आढळला आहे. मांडओहळ धरणापासुन पुढे वासुंदेच्या ठाकरवाडी हद्दीमधे मांडओहळ नदीपात्रामधे गणेश दहीफळे याचा मृतदेह ठाकर समाजाच्या लोकांनी पाहीला आणि अहमदनगर जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना सदर घटनेची माहीती दिली.

झावरे यांनी विलंब न लावता पारनेर पोलीस प्रशासनास हि माहीती दिली. लागलीच पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तसे पाहीले तर एनडीआर एफच्या पथकाने अथक प्रयत्न केले मात्र धबधब्या्चा जोर प्रचंड असल्याने व ७० फुट खोल व रांजणखळग्यासारखे आकार असल्याने पाणबुडे गॅस सिलेंडर सह बाहेर फेकले गेल्यामुळे शोध मोहिमेला अडचणी आल्या.

मेजर मनोजकुमार यांचे नेतृत्वाखाली १८ जणांचे पथक ६ तास शोध मोहिम करण्यात आली. पाणबुडे यांनी खाली डोहामध्ये शोध घेतला. त्यावेळेस त्यांना बाजूने कपारी असल्याने त्याचा सिलेंटर अडकण्याची शक्यता होती तसेच एकदा एका पाणबुड्यांच्या संपर्क काही वेळ तुटला त्यानंतर त्याला वर काढले व पुन्हा शोध मोहीम सुरू केली तरीही शोध लागला नाही अखेरीस पाण बुड्यांना वरती बोलवण्यात आले. आणि शोध माहीम थांबवण्यात आली अशी माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली होती.

गणेश सापडला नाही म्हणुन एनडीआरएफने हात टेकले आणि हताश होवुन परतत असताना गणेश दहीफळे याचा मृतदेह वासुंदेच्या ठाकरवाडी हद्दीमधे मांडओहळ नदीपात्रामधे सापडल्याची खबर मिळाली. अगोदर दोन दिवस रेल्वे पोलीसांनी रुईचोंडा धबधब्यात शोधमोहीम राबवली परंतु यश आले नव्हते. त्यानंतर पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी एनडीआरएफच्या जवानांची तुकडी बोलावली मात्र त्यांच्याही प्रयत्नांना अपयश आले.

१८ जणांच्या तुकडीने ४८ तास शोध घेतला. खोल डोहामधे अथक प्रयत्न करुनही गणेश सापडला नाही.पाण्याचा वेगही जास्त होता त्यामुळे अनेकअडचणी येत होत्या. कुठल्यातरी कपारीमधे मृतदेह अडकला असावा आणि तो काही काळाने फुगुन बाहेर पडेल असा कयास लावण्यात आला.

एनडीआरएफचे शोध कार्य धबधब्यामधे होत होते. मृतदेह फुगुन वर येईल हा त्यांचा कयास बरोबर होता आणि तो बरोबरही ठरला. मृतदेह फुगुन वर येवुन पाण्याच्या प्रवाहाने वाहत वासुंदेच्या ठाकरवाडी पर्यंत गेला होता. गणेश दहीफळे या रेल्वे पोलीसाचा मृतदेह मांडओहळ नदीपात्रामधे ठाकर समाजालास आढळुन आला. अशा प्रकारे अखेर गणेशच्या मृतदेहाचा शोध लागला.

अवघ्या ८ वर्षापूर्वी गणेश रेल्वे पोलीसमधे भरती झाला होता. लग्नाला अवघे तीनच वर्ष झाले होते. त्याला दोन वर्षाचा एक लहान मुलगाही आहे. अशा प्रकारे गणेशचा अर्ध्यावरती डाव मोडला आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता नगर येथील चार रेल्वे पोलीस मांडओहळ धरण व रुईचोंडा धबधबा पाहण्यासाठी आले होते. फोटोच्या नादामधे गणेशचा तोल पाण्यामधे गेला आणि पाण्याच्या भोवर्‍याने गणेशला खोल पाण्यात खेचले. याची कल्पना त्याच्या मित्रांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना दिली.

पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रमश: पोलीस,आपत्कालीन विभाग, स्थानिक नागरीक, महसील विभाग, रेल्वेपोलीस एनडी आरएफ जवान,सर्वांच्या मोठ्या प्रयत्नांना अपयश आले.मात्र गणेशचा मृतदेह मिळाल्याने सर्व यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *