महापालिकेच्या विविध विभागांसाठी तेरा लाखांची लॉकर, बेंच खरेदी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या विविध विभागांसाठी लॉकर आणि थ्री सीटर बेंच खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी १२ लाख सहा हजार २९५ खर्च करण्यात आला आहे. विविध विभागांना लॉकर व इतर साहित्याची गरज होती, त्यानुसार मध्यवर्ती भांडार विभागाने २१ हजार ८७ हजाराची निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी १० निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी चार निविदा पात्र ठरल्या. तब्बल ४२.१५ टक्के कमी दराची सांगवी येथील इंद्रनील टेक्नॉलॉजीजची निविदा पात्र ठरली आहे.

त्याच्याकडून १३ हजार ९५९ दराने १२ लॉकर, सहा हजार ७८५ रुपये दराने थ्री सीटर बेंच आणि चार हजार ९५९ रुपये दराने हॉस्पिटल बेंच खरेदी करण्यात आले आहेत. विविध विभागांसाठी फाइल, इतर आवश्यक कागदपत्र ठेवण्यासाठी लहान आकाराची लोखंडी ८७ कपाटे व ७० बुककेस खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी १३ लाख ३९ हजार खर्च करण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *