जुन्नर तालुक्यातील सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२५ ऑक्टोबर २०२१

जुन्नर


जुन्नर तालुक्यातील सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने जुन्नर तालुक्यातील सहा शिक्षकांना नुकतेच राजगुरुनगर खेड येथे रविवार (दि.२४) रोजी सन्मानित करण्यात आले. यावेळी जुन्नर तालुक्यातील तुषार आहेर (सरदार पटेल हायस्कूल, अणे),गोपाल औटी (विद्या विकास मंदिर, राजुरी),बाळासाहेब आरेकर (श्री संत तुकाराम विद्यालय, निरगुडे),सुनील जाधव (हिंदमाता विद्यालय वडगाव कांदळी), सुरेखा नढे (पुष्पावती विद्यालय डिंगोरे), सदानंद उकिर्डे शंकर बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर) या सहा जणांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे तसेच संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले,पीडीएफ चे अध्यक्ष के.एस. ढोमसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त शिक्षकांची जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

जुन्नर तालुक्यातील सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *