वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, ४८ लाखांचा दंड वसूल

२९ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


मोठा आवाज निघावा, यासाठी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या तब्बल ४ हजार ८४६ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. चालू वर्षात ४ हजार ८४६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून, पोलिसांनी ४८ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध वाहतूक विभागाच्या हद्दीत १ जानेवारी ते २३ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ४ हजार ८४६ जणांवर कारवाई केली. यामध्ये बेशिस्त चालकांकडून ४८ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सांगवी वाहतूक विभागात सर्वाधिक १ हजार ६६० जणांवर कारवाई झाली. वाहतूक विभाग कारवाई पुढीलप्रमाणे – भोसरी-४२०, चाकण ४३२, चिंचवड-१२८, देहूरोड-२७५, दिघी-आळंदी – ४२, हिंजवडी – २८८, म्हाळुंगे – ८७, निगडी- २३०, पिंपरी-४५०, तळेगाव-३४, तळवडे – ११४, वाकड- ६३४.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *