प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मानले आभार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र शिंदे गट-भाजपचे उमेदवाराने माघार घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केले होतं. यादरम्यान शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्राची दखल घेत विनंती केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांचे ट्विट करत आभार मानले आहेत.

मी लिहलेल्या पत्राचा मान ठेवून तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंधेरी येथील पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची विनंती केलीत यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे जतन करणारे तुमच्यासारखे शिलेदार आहेत याचा मला अभिमान आहे. अस ट्विट प्रताप सरनाईक यांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *