राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्राच्या माध्यमातून मानले आभार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार माघार घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्राच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

राज ठाकरे पात्रातून म्हणाले, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *