संजय राऊतांच्या न्यायालयानी कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोठडीत वाढ झाली असल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नाही. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *