खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांत झाली वाढ

पिंपरी प्रतिनिधी
१७ ऑक्टोबर २०२२


दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स तसेच एसटी बसची बुकिंग सुरू होते . सणांचा हंगाम लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचालक अव्वांच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करताना दिसून येते आहेत . ऑफ सीझनमध्ये जेथे ६०० रुपयांना तिकीट होते , ते आता दोन हजारांवर गेले आहेत . खासगी ट्रॅव्हल्सचालकाकडे नागपूरसाठीच्या तिकिटाची विचारणा केली असता तब्बल १४०० रुपये तिकिटाचे दर सांगितले.

थेट करा आरटीओकडे तक्रार गर्दीच्या काळात तब्बल दीडपट जादा तिकीट ट्रॅव्हल्सचालक घेऊ शकतात . मात्र , त्यापेक्षा अधिक तिकीट घेऊन ते लूट करत असतील तर प्रवासी थेट आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करू शकतात . या तक्रारीची शहानिशा करून आरटीओ अधिकारी संबंधितांवर कारवाई करतात . शिवाय ग्राहक म्हणून प्रवासी थेट ग्राहक न्यायालयातदेखील जाऊ शकतात आणि न्याय मागू शकतात.

खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर ठिकाण
सध्याचे दर – 
पुणे – नागपूर ८०० ते १२००
पुणे – सोलापूर ५०० ते ८००
पुणे- अकोला ७०० ते १२००
पुणे – नांदेड ७०० ते १०००

दिवाळीतील दर – 
पुणे – नागपूर २५०० ते ५०००
पुणे – सोलापूर २५०० ते ३०००
पुणे- अकोला ३००० ते ६०००
पुणे – नांदेड २५०० ते ३५००


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *