जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने २०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२ डिसेंबर २०२१

जुन्नर


Farmers in Belhe village face untimely crisis
बेल्हे गावातील शेतकरी अवकाळी संकटाचा झुंज
देत आहेत

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात २०० पेक्षा जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरी अनेक ठिकाणी पंचनामे करण्याचे काम अजून सुरू असून यामध्ये मेंढ्यांच्या मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

goats in sheds as well as outside died due to unseasonal rains
शेडमधील तसेच बाहेरील शेळ्या अवकाळी पावसामुळे मरण पावल्या

यामध्ये आळेफाटा परीसरातील राजुरी ,आळे,वडगाव आनंद,वडगाव कांदळी,बोरी बुद्रुक,बेल्हे, गुळुंचवाडी,शिरोली,निमगाव सावा या गावात आलेल्या मेंढपाळांच्या २०० पेक्षा जास्त मेंढया तसेच ३ गाया मुत्यूमुखी पडल्या आहेत. यामध्ये राजुरी ४१, बेल्हे ८,गुळुंचवाडी ८, शिरोली तर्फे आळे ५, निमगाव सावा २ बोरी १४, आळे १८,वडगाव आनंद १०० मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळांच लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. संबधित मृत्यूमुखी पडलेल्या मेढयांचा तसेच मुत्यूमुखी पडलेल्या तीन गाईंचे पंचनामा तलाठी तसेच पशुवैद्यकिय अधिकारी यांनी जागेवर जाऊन केला आहे.तरी अजून काही ठिकाणी पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान अवकाळी पावसामुळे मका ,कांदा ,डाळींब ,ऊस तसेच द्राक्षे या पिंकाचे नुकसान झालेले असुन या पिकांची झालेली नुकसानीची भरपाई शेतक-यांणा मिळावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *