इलेक्ट्रिक वाहन घेताय; चार्जिंग कुठे करणार ?

पिंपरी प्रतिनिधी
१७ ऑक्टोबर २०२२


दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली , इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढच होते आहे . मात्र चार्जिंग स्टेशनची संख्या मात्र वाढताना दिसत नाही . पुणे आरटीओमध्ये दसऱ्याच्या कालावधीत म्हणजे एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २५ चारचाकी आणि ४३१ दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली . याच कालावधीत पिंपरी – चिंचवडमध्ये १४,५६७ वाहनांची नोंदणी झाली . यामध्ये देखील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या जास्त होती . मात्र , इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना त्यातुलनेत सार्वजनिक ठिकाणी गाडी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स नसल्याचे दिसून येत आहे . चार्जिंग स्टेशन्स कधी वाढणार ? शहरात सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स नाहीत . पालिकेकडून केवळ चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली मॉल ,आहे. तसेच सिनेमागृहाच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्याची सुविधा आहे. मात्र , तेथेदेखील चार्जिंग पॉईंट अधिक नसल्याचे सांगण्यात आले.

महापालिका उभारणार चार्जिंग स्टेशन पिपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने वाहतुकीस अडथळा ठरणार नाही , अशा ठिकाणी सार्वजनिक खासगी सहभागातून ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महापालिका विचार करीत आहे . जास्तीत जास्त सुलभता , सदुपयोग आणि कमीत कमी खर्च या तीन तत्त्वांवर चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहे नागरिकांना आपले वाहन सुलभतेने चार्जिंग करता यावे यासाठी चार्जिंग स्टेशन्सच्या ठिकाणी रोड पार्किंग , ओपन पार्किंग , बेसमेंट पार्किंगची व्यवस्था असावी , याची दक्षतादेखील घेणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *