बालक मंदिर मधील गोकुळ नगरीत सजला दहीहंडी सोहळा

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१८ ऑगस्ट २०२२

नारायणगाव


विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी,आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून गुरुवार दि. 18/8/2022.रोजी ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिर मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गोकुळअष्ट्मी निमित्त दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला.आला रे आला गोविंदा आला असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दहीहंडीत सहभागी झाले होते .

अनेक बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन घडले. इयत्ता 1ली व 3 री च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर सुंदर नृत्ये सादर केली . तसेच इ.4 थीच्या अवनिश नितीन बोऱ्हाडे याने कृष्ण जन्माच माहिती सांगितली व इ.3 री ची विद्यार्थिनी सान्वी महेश घोडेकर हिने जन्माष्टमीची गोष्ट सांगितली.

 

 

या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्रीमती नंदाताई डांगे मॅडम,डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण मा. श्री. अनिल तात्या मेहेर सर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह मा. श्री. रवींद्र पारगावकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन मा. श्री. अरविंदभाऊ मेहेर सर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा. श्री. शशिकांत वाजगे सर, बालक मंदिर समितीच्या सदस्या मा. सौ मोनिकाताई मेहेर मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा.श्री. रमेश जुन्नरकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य मा. श्री. देविदास भुजबळ सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम उपस्थित होत्या.

इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी थर रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद म्हणून पोह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. नूतन शेळके मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले .अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात शाळेतील दिंडी सोहळा चा कार्यक्रम पार पडला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *