विजेची तार अंगावर पडून आळे येथे जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

रामदास सांगळे
विभागीय संपादक
दि.9/9/2021

जुन्नर

आळे (जुन्नर) ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अंगावर विजेची तार पडून एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गुरुवार सकाळी नऊच्या सुमारास दिलीप भालचंद्र धोंगडे (वय-७४)

याबाबत अधिक माहिती अशी की, आळे (जुन्नर) ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गुरुवार सकाळी नऊच्या सुमारास दिलीप भालचंद्र धोंगडे (वय-७४) हे आपल्या स्वत:च्या घराकडे जात असताना अचानक गल्लीतील विद्युत वाहिनीची तार त्यांच्या अंगावर पडली.तार अंगावर आल्याने ते खाली कोसळले. तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना ऍम्ब्युलन्स बोलावून उपचारासाठी आळे रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धोंगडे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.

आळेफाटा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याचा अधिक तपास आळेफाटा पोलिस करीत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ विजेच्या खांबावर अनेक मीटर वायर व ताराचे जाळे तयार झाले असल्याने धोका वाढत आहे.तसेच गावाच्या बसस्थानकाजवळील आगरमळा रोडवर वरील पोलच्या तारा रस्त्यावर आल्याने मोठया वाहनांना जाता येता अडथळा होत आहे.ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या या ठिकाणाहून जाताना तारा लाकडाने वर उचलून धाराव्या लागतात.या तारा उंच कराव्यात किंवा पोल बदलून द्यावेत शी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *