…त्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा; अजित पवार यांचे महापालिका अधिकाऱ्यांना आदेश 

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०६ ऑगस्ट २०२२
मोशी


दिवसेंदिवस झपाट्याने विकसित होणाऱ्या मोशो परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम रखडलेले आहे. बाह्य आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान मोशीमध्ये भेट दिली. त्या दरम्यान रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल चर्चा झाली. मोशीतील लक्ष्मीचौक ते स्वराज सोसायटीपर्यंतच जुना गट १३१४ नवीन १९६ मधील बारा मीटर रस्त्याचे काम त्वरीत सुरु करण्याची आदेश संबधिंत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सुमारे सहा हजार सदनिका धारकांना या रस्त्यामुळे मिळणार दिलासा

देहू आळंदीरोडवरील लक्ष्मी चौकपासून ते स्वराज हौसिंग सोसायटीपर्यंत एकूण चोवीस मीटर रस्ता विकसित करणे आहे. त्यातील काहींनी संमतीपत्र तर काहींचा टीडीआर झालेला आहे. त्यातील बारा मीटर रस्ता महापालिकेच्या ताब्यात आला असून, त्याचे काम तत्काळ सुरु व्हावे अशी मागणी माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

पिंपरी-चिंचवड दौऱ्यात अजित पवारांचे मोशीत ‘लक्ष्य’

त्यावर संबधिंत विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून, अजित पवार म्हणाले, महापालिकेच्या नगरचना विभागाने मोशी आणि चिखलीची हद्द आणि त्यातील बॉन्ड्री फायनल करून, ज्या बारा मीटर रस्त्याचा ताबा झालेला आहे. त्या जागेचा सर्व्हे करून काम सुरु करावे. स्वराज चौक ते इंद्रायणीनदी पर्यंत जागेवरची परस्थिती पाहून स्थानिक शेतकऱ्यांशी प्रशासनाने चर्चाकरून रस्त्याचे काम पूर्ण करण्यास मार्ग मोकळा करावा. तसेच रस्त्याचे काम करत असताना, स्ट्रॉमवॉटरलाईन, ड्रेनेज, विद्युतवाहिन्यांचे काम चांगले करा. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास भविष्य़ात झाला नाही पाहिजे. दर्जेदार काम करण्यावर भर द्या असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

या सोसायट्या करणार या रस्त्याचा वापर-

स्वराज सोसायटी, ऐश्वर्यम हमारा, क्रिस्टल, आरकेएच, शुभयोग, प्रिस्टीनग्रीन, स्विल्वरनाईन अशा सोसायटीतील किमार सहा हजार सदनिकाधारक