डि व्हाय पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनॅजमेण्टतर्फे “आदीशक्ती द पॉवर ऑफ वूमन” हा कार्यक्रम आयोजित

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी यांच्या विशाखा – द वुमेन डेव्हलपमेंट समितीने १४ ऑक्टोबर 2022 रोजी “आदिशक्ती – द पॉवर ऑफ वुमन” या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पौर्णिमा गायकवाड (पोलिस उपायुक्त, विभाग 3, पुणे शहर), सौ. संगीता तरडे (संचालक, आपला आवाज आपली सखी वुमन फोरम) आणि सौ. श्वेता माळी (सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्यांच्या मातोश्री) ह्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. ह्या सर्व जणींनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या खडतर प्रवास, स्त्री म्हणून आपल्याला आलेल्या अडचणी ह्यावर संभाषण केले.

सदरील चर्चासत्राचे आयोजन प्राचार्य डॉ. मिलिंद पेशवे यांनी केले होते तसेच प्रो. देविका मुतालिक ह्या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या तसेच त्यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले. डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील ह्यांचे मार्गदर्शन लाभले आणि प्रो. अश्विनी तलाऊलिकर ह्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. हे चर्चा सत्र संस्थेच्या ताथवडे कॅम्पस मधील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *