आदिवासी तरुणांनी व्यवसायाभिमुख व्हावे – ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉ. हरीष खामकर

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१६ ऑक्टोबर २०२१

आंबेगाव


आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथे ट्रायबल फोरम आंबेगावच्या कार्यकारणीची बैठक उत्साहात पार पडली.

त्यावेळी कार्याध्यक्ष दिपक चिमटे म्हणाले, आदिवासी भागातील आर्थिक शैक्षणिक व रोजगार या विषयांवर भर देण्यात येईल भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य असून समाजात द्वेष भावना पसरवणाऱ्या धार्मिक व संस्कृती सांगून जातिभेद करणाऱ्या संघटनांकडे दुर्लक्ष करून वैज्ञानिक व आधुनिक विचारसरणीचा अवलंब करून आदिवासी माणसाच्या प्रगती तसेच उन्नतीसाठी ट्रायबल फोरम आंबेगाव तालुक्यात काम करणार आहे असे प्रतिपादन तालुका कार्याध्यक्ष दिपक चिमटे यांनी केले.

अध्यक्ष भाषणात डॉ. हरीश खामकर यांनी सांगितले, की “प्रामुख्याने ठाकर, कातकरी, कोळी महादेव या आदिवासी समाजातील जमातींसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. सरकारी नोकऱ्या व त्यामधील आरक्षण जवळपास संपले आले असून तरुणांनी व्यवसायाभिमुख व्हावे त्यासाठी ट्रायबल फोरमच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.”

त्याप्रसंगी गोहे खुद चे सरपंच अंकूश कंरवदे यांची फार्मर (शेतकरी ) फोरम च्या तालुका अध्यक्ष पदी , तळेघरचे उपसरपंच सुहास रोंगटे यांची फार्मर फोरमच्या कार्याध्यक्ष पदी, पोखरीचे उपसंरपच सचिन भागीत यांची युवक कार्याध्यक्ष पदी, फलोदेचे उपसरपंच मनोहर मेमाणे यांची युवक महासचिव, उगलेवाडीचे उपसरपंच शंकर शिंगाडे यांची शिनोली शाखा प्रमुख पदी, अनिल कारोटे यांची कोंढवळ गावांदेवाडी च्या शाखाप्रमुख पदी, किरण केदारी तेरूगंण गावच्या शाखाप्रमुख पदी, ज्ञानेश्वर विरणक यांची ढगेवाडी शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यावेळी तेथील तरूणवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्वर विरणक, अनिल कारोटे, किरण केदारी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रायबल फोरमचे महासचिव विशाल दगडे यांनी केले तर प्रास्ताविक ट्रायबल फोरमचे मार्गदर्शक मारुती तळपे यांनी केले. तालुक्याचे उपाध्यक्ष सोमनाथ गेंगजे यांनी कार्यक्रमांचे आभार मांडले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *