बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले तर सावधान

पिंपरी प्रतिनिधी
३० सप्टेंबर २०२२


विविध वेबसाइट, फोन कॉल्स , एसएमएस मेल अशा विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमाद्वारे भविष्य निधी दाव्याचा निपटारा वाढीव पेंशन आणि भविष्य निधीद्वारा देण्यात येणाऱ्या विविध सेवासंदर्भात बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात येते . त्यासंदर्भात सावधानी बाळगण्याचे आवाहन भविष्य निर्वाह निधीच्या वतीने आयोजित परिसंवादात करण्यात आले.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारा केल्या गेलेल्या विविध प्रकारच्या संकल्पनासंदर्भात अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त , एम . एस . के . वी . वी . सत्यनारायण , पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय , आकुर्डी यांच्याद्वारे परिसंवाद आयोजित करण्यात आला सदर परिसंवादामध्ये आधार संलग्रीकरण , केवायसी अद्ययावत करण्यासंदर्भात आणि भविष्यात त्याद्वारे होणाऱ्या लाभासंदर्भात हितधारकामध्ये जनजागृती करण्यात आली. के . रवींद्र कुमार कर्मचारी भविष्य निधी आयुक्त १ , आकुर्डी , पुणे , मनोज माने कर्मचारी भविष्य निधी आयुक्त , मनोज असरानी प्रवर्तन अधिकारी व आलोक कुमार , चंद्रशेखर आझाद , अखौरी संदीपप्रसाद , हेमराज मेहरा आदी उपस्थित होते. सदर परिसंवादात प्रोफाइल सुधारणा , केवायसी सुधार / परिवर्तन , ईस्वाक्षरी संबंधित विविध मुद्दे , त्या संदर्भातील माहितीसंदर्भात चर्चा करण्यात आली . या परिसंवादात विशेषतः हितधारक आणि नियोक्ता यांनी भाग घेतला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *